लोक न्यूज
अमळनेर : आजारी सासुला दवाखान्यात घेऊन गेलेल्या महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्यानी ८० हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरीस गेल्याची घटना ८ रोजी साडे अकरा ते दीड वाजेदरम्यान गलवाडे रस्त्यावर घडली.पूनम अनिल गव्हाणे वय २७ रा श्री समर्थ नगर श्रद्धानगर जवळ गलवाडे रस्ता ही महिला आपल्या आजारी सासुला धुळे रोड वरील गणपती हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली तेव्हा घराला कुलूप न लावता कडी लावून गेली. दवाखान्याचे काम आटोपल्यावर सव्वा वाजता घरी परतल्यावर तीने मुलाला पैसे देण्यासाठी कपाट उघडले असता कपाटातील लॉकर मधील २५ हजार रुपये किमतीचा १० ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस , १२ हजार ५०० रुपयांचे ५ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ,अडीच हजार रुपये किमतीची १ ग्राम वजनाची नथ , ४० हजार रुपये रोख असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेलेला दिसून आला. चोरट्याने कपाट उघडून तेथील लॉकर ची चावी काढून चोरी केल्याचे निदर्शनास आले. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.