लोक न्यूज
अमळनेर-पुणे येथे विविध भागात खान्देशी बांधवांचा भव्य कानबाई उत्सव जल्लोषात पार पडला.माजी मंत्री तथा अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील व खान्देशी कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीने हा उत्सव अधिकच बहारदार ठरला.
         आमदार पाटील यांचे संपूर्ण पुणेकर खान्देशी बांधवांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांना पुणे येथे विविध ठिकाणी होणाऱ्या कानबाई उत्सवात निमंत्रित करण्यात आले होते.यात चाकण येथील मीरा मंगल कार्यालय,श्रेया लॉन्स,पिंप्री चिंचवड येथील चिंतामणी चौक,वाल्हेकर वाडी व सुमंगल मंगल कार्यालय पिरंगुट आदी ठिकाणी आमदार पाटील यांनी उपस्थिती देत सर्वांचा उत्साह वाढविला.मीरा मंगल कार्यालय चाकण येथे पूणे जिल्हयातील पहीला मानाचा कानबाई उत्सव होता,आयोजनाचे हे तिसरे  वर्ष होते.खान्देशातील रीती रीवाजाप्रमाणे मोठ्या  जल्लोशात आनंदमय वातावरणात पहिल्या दिवशी देवीचे रोट दळणे, दुसऱ्या दिवशी देवीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमात विषेश आकर्षण म्हणजे खान्देश कन्या मिसेस इंडीया इंटरनेशनल अभिनेत्री तथा फॅशन माॅडल सौ. मृणाल पाटील,सुमीत गायकवाड तसेच खान्देशी गायक  दिलीप जी गायकवाड़ व विशाल बाविस्कर,रील्स कलाकार सौ. संगिता पाटील, सौ.ॠतूजा घोडतूरे( अहीराणी अभिनेत्री फेम लगीन मा नाचाडू धुम रे धुम),सौ.क्रांति पाटील, खान्देशी फाॅरेनर उर्फ अरुण सोनार नंदुरबारकर या खान्देशी कलाकारांनी उपस्थिती दाखवली व काॅमेडी, डान्स तसेच आपापल्या कला भूमिका साकारुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.आणि या खान्देशी कलाकारांच्या उपस्थितीत खान्देश बंधू- भगीनी सर्व कानबाई मातेच्या भक्तांनी खान्देशी कानबाई मातेच्या गाण्यांवर ठेका धरला व मोठ्या उत्स्वाने भक्तीभावाने रविवारी जागरण गोधंळाचा कार्यक्रम पार पडला.
       या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले आमदार अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात अहीराणी भाषेमध्ये विनोद करुन उदाहरणं देवून सर्व कानबाई भक्तांचे लक्ष वेधून घेतले.व आपली लोकं 400 कीलोमीटर वर येवून आपली संस्कृति,भाषा, सण-उत्सव जोपासण्याचं काम करत आहेत म्हणून सर्व खान्देश बांधवांचं अहीराणी भाषेतूनच कौतुक केलं. करणी सेना प्रवक्ता ठा. दिनेश जाधव यांनी आपल्या भाषणातून सर्व खान्देश बांधवांच स्तुती सुमनाने अभिनंदन व स्वागत केले.आमदार पाटील यांना चाकण खान्देश बांधवांसाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात आली. कमेटीच्या वतीने महीलांना पूढे करत जेष्ठ सौ.अरुणा पगारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खजिनदार रमेश पगारे  यांच्या परीश्रमाने तीन दिवसीय कानबाई माता उत्सव अतिशय उत्साहात पार पडला. संध्याकाळी आरतीचा मान हा उद्योजक राणा प्रितम  परदेशी सौ.आरती परदेशी यांना देण्यात आला.तसेच या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय,उद्योजक, बिल्डर,
डॉक्टर,विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी कानबाई मातेचं दर्शन घेवून शुभैच्छा दिल्यात.सल्लागार योगराज जी काटे, रामलाल जिभाऊ, दिनेश जाधव,कीशोर  अहीरे,शशी पाटील,संजय पाटील,विनोद राणा  के. एन.माळी,श्री चित्ते,मनोज पाटील,भूषण पाटील, मुन्ना राजपूत,दिनेश गुरव ,विशाल पाटील,अमित यादव, बापू गुरव, विकास चौधरी,रोहन शेवाळे, संदिप पाटोळे, अक्षय, राहूल,सौ.सुनंदा काटे, सौ. चेतना राजपूत,सौ. पल्लवी अहीरे, सौ, माळी , सौ. दिक्षा पाटील, सौ. नैना पाटील, सौ. पूजा पाटील, सौ. पूनम पाटील, सौ. विशाखा पाटील, सौ. दिपाली माळी, सौ. शुभांगी पाटील, सौ. प्रतिभा पाटील, सौ. छाया पाटील, सौ.मीना पाटील, सौ. सविता पाटील आदींनी परिश्रम घेतले.
       तर इतर चार ठिकाणी आयोजनाबद्दलही आमदार पाटील यांनी खान्देशी बांधवांचे तोंडभरून कौतुक केले.