लोक न्यूज
अमळनेर | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने अमळनेर शहर व तालुक्यातील नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे विचार, कार्य आणि जनसंपर्क अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या असून युवा नेतृत्वाला संधी देण्याचा हेतू यात आहे.
या वेळी खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली:
शहर उपाध्यक्ष: राजेश नेरकर, सुमित ब्रम्हे
शहर सचिव: वेदांत पाटील, उदय बैसाने
शहर सरचिटणीस: आयुष पाटील,हर्षल निकम
तालुका उपाध्यक्ष: गौरव चौधरी,
तालुका संघटक:राज पाटील

या सर्व नविन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व माजी मंत्री,आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते व सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा बोरसे यांच्या उपस्थितीत, मीडिया शहराध्यक्ष रोहित सूर्यवंशी तालुकाध्यक्ष मयूर बोरसे तालुका शहर कार्याध्यक्ष हितेश नायदे, संघटक जयेश देवरे यांच्या पुढाकारणे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या नियुक्त्यांमुळे अमळनेर शहर व तालुक्यातील सोशल मीडिया प्रचारकार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला