अमळनेर : महादेवाच्या मंदिरावर जाऊन येते असे सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना १४ रोजी सकाळी १० वाजता शहरातील पैलाड भागात श्रीकृष्ण कॉलनीत घडली.
एक १५ वर्षे ५ महिने वय असलेली मुलगी वडिलांना महादेवाच्या मंदिरावर जाऊन येते असे सांगून गेली. आई दुपारी २ वाजेला शेतातून आल्यावर मुलगी घरी नसल्याने शोधाशोध सुरू झाली. मुलगी मिळून आली नाही म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.