अमळनेर : तालुक्यातील सात्री येथे खल्याला आग लागल्यानंतर अचानक घरांनी पेट घेतला. आगीत चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत. नागरिकांचा प्रचंड आक्रोश सुरू आहे. एका घरात गॅस सिलिंडर चा स्फोट झाल्याने आग अधिकच वाढली आहे. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे ,मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दोन अग्निशमन बंब रवाना केले आहेत. पारोळा ,चोपडा ,धरणगाव येथून देखील गाड्या मागवण्यात आल्या आहेत. ग्रामस्थ आपल्या परीने आग विझवण्यासाठी मिळेल त्या साधनानी आटोकाट प्रयत्न करीत होते.