लोक न्यूज
अमळनेर-माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेला नवीन हेडावे-सारबेटा
रस्ता अमळनेरकरांसाठी ठरणार वरदान असून सदर रस्त्याचे काम जोमाने सुरू असल्याने आमदार अनिल पाटील यांनी नुकतीच कामाची पाहणी केली.
प्रामुख्याने अमळनेर येथून जळगाव जाणाऱ्यांसाठी हा रस्ता विशेष वरदान ठरणार आहे.आमदार अनिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमार्ग निधीतून 13 किमी चा हा रस्ता मंजूर केला असून अमळनेर येथून राजवड फाट्याच्या पुढे अमळनेर तालुक्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याचे नुतनीकरण व डांबरीकरण होणार आहे.विशेष म्हणजे 12 मीटर रुंदीकरणासह हा रस्ता होत असल्याने रस्त्याचे स्वरूप अतिशय विस्तीर्ण होणार आहे.संपूर्ण रस्ता डांबरीकरण असून यात गावहद्दीत काँक्रीटीकरण व गटार बांधकाम तसेच सर्व पूल देखील नूतनीकरण होणार आहे.यासाठी 36 कोटी निधी मंजूर झाला आहे.सदर काम अतिशय वेगाने सुरू असून आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी करत कामगारांना काही सूचना देखील केल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील,विजयकुमार जैन,माजी स्कुल बोर्ड सभापती नितीन निळे,भिला पाटील व नागरिक उपस्थित होते.
हेडावे रस्त्याला वाढणार वाहतूक
गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने प्रवाश्यांची गैरसोय होत होती.आता मात्र आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून हा रस्ता नवीन होत असल्याने विशेष करून अमळनेर येथून जळगाव जाण्यासाठी हा सोईचा मार्ग ठरणार आहे.कारण टाकरखेडा मार्गे जाताना सती माता जवळील रेल्वे बोगद्यात अनेकदा पाणी साचत असते पावसाळ्यात तर खूपच परिस्थिती बिकट होत असते.तसेच हेडावे रस्ता थेट धरणगाव येथील रेल्वे उड्डाणपुला जवळ निघत असल्याने प्रवाश्यांचा गावाचा त्रासही टळणार आहे.यामुळे रस्ता पूर्ण झाल्यानंतर जळगाव जाणारे प्रवासी या रस्त्यालाच पसंती देतील असे बोलले जात आहे.लवकरच हे काम पूर्णत्वास येईल असे संकेत ठेकेदाराने दिले आहेत.