लोक news-
अमळनेर शहरात सध्या मुलं-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांचा वाढती संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. यामागे सायबर कॅफे आणि संगणक क्लासेसमधील गुप्त वर्कस्पेसचा उपयोग आणि पालकांची दुर्लक्षता महत्त्वाची कारणे मानली जात आहेत.
सायबरकॅफेतील आणि संगणक क्लासेसमधील बाहेरील बंदिस्त काच पालकांमध्ये मोठा संशय निर्माण करत आहे. कारण आतून बाहेर स्पष्ट दिसते, पण बाहेरून आतलं काहीच दिसत नाही. यामुळे पालकांना माहिती होत नाही की त्यांचे लहानग्यां काय करतात, कोणाशी संवाद साधतात किंवा कोणत्या गतिविधींमधून जातात?
क्लासेसच्या नावाखाली अनेक ग्रुप तयार होऊन मुलं-मुली ऑनलाईन चॅटिंगमध्ये गुंतलेले दिसतात. येथेच मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांना चालना मिळत असल्याचे लक्षात आले आहे. परदेशी संस्कृतीचे अपप्रचार, चित्रपटांतून घेतलेला चुकीचा संदेश आणि घरातील संयुक्त कुटुंबातील संस्कारांची कमतरता यामुळे विद्यार्थी चांगल्या मार्गापासून लांब पडत आहेत.
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या तरुणांच्या ज्या वयात जेव्हा त्यांना पुस्तके वाचून ज्ञान संपादित करायचे असते, तेव्हा ते दिवसेंदिवस स्मार्टफोनच्या मोहात अडकून आपले भविष्य उजेडातून अंधारात नेत आहेत. व्यसनाधीनता, कमीत कमी कालावधीत जास्त पैसे कमावण्याची इच्छा यामुळेही ते चुकीच्या वाटेवर चालत आहेत.
पालकांनी या संदर्भात जागरूक होणे गरजेचे आहे. अनेकदा पालकांना क्लासेसच्या वेळा माहित नसतात आणि त्यांचा मुलगा-मुलगी काय शिकतात याबाबत त्यांना माहिती नसते. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांच्या फोनचे परीक्षण करणे, त्यांच्या  क्लासेचा मागोवा घेणे अत्यंत आवश्यक आहे. क्लासच्या नावाखाली कुठे तरी वेगळ्या ठिकाणी मुलं वस्तुतः काय करत आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.काही वाचाळ संचालकांनीही आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून, अशा अनियमिततेवर नियंत्रण ठेवावे कारण सध्या अनेक सायबर कॅफे आणि संगणक क्लासेसमध्ये गोंधळ दिसून येतो. रस्त्याच्या बाहेर कुठेही सायकली मोटरसायकल लावलेल्या असतात.येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो.. शहरभर या विषयावर दबक्या आवाजात चर्चा सुरु असून, ‘सापडलेल्या कळी’नुसार बेपत्ता बालकांच्या घटनांमागे हीच परिस्थिती प्रमुख कारणीभूत आहे.
पालकांनी  आपली जबाबदारी ओळखून केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता तार्किक जबाबदारी घेणे गरजेचे आहे. मुलांच्या वयातील योग्य संगोपन, वेळोवेळी चौकशी आणि संवाद साधणे हेच त्यांचे बालक सुरक्षित राहण्याचे मुख्य साधन आहे. याशिवाय शहरातील शिक्षणसंस्थांनीही मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि नैतिक शिक्षणासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत.
आम्ही पालकांना विनंती करतो की, त्यांनी आपल्या पाल्यांच्या जीवनावर अधिक लक्ष ठेवावे, ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही विश्वात मुलांचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता वाढवावी, कारण मुलांच्या सुरक्षिततेचा प्रमुख स्तंभ म्हणजेच आपली काळजी आणि संवाद! आहे.