लोक न्यूज
अमळनेर-जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडली असून जिल्ह्यातील दोन माजी मंत्री,तीन माजी आमदार,अमळनेरच्या दोन महिला नेत्यांसह विद्यमान तालुकाध्यक्ष,शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट आदी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल झाले आहेत.
काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाचा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वागत करत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी पक्षाचे उपस्थित नेते मंडळी, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आदी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला, काही विषयांवर मार्गदर्शनही केलं.यावेळी प्रदेशाध्यक्ष खा सुनिल तटकरे,कृषी मंत्री माणिकराव कोकाटे,आ अनिल पाटील यासह जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
यांचा झाला प्रवेश,,,
यावेळी नंदुरबार, धूळे आणि जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.त्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जेष्ठ नेत्या श्रीमती तिलोत्तमा पाटील, माजी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, श्रीमती जाहिदा मोदी पठाण, यशवंत पाडवी,ग्रंथालय सेलच्या सौ रिता बाविस्कर,शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील,अमळनेरचे बिल्डर हेमंत पवार,अमळनेर युवक तालुकाध्यक्ष परेश शिंदे,शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख किसन देवराम पाटील,माजी सरपंच अलीम मुजावर,सरपंच प्रा डॉ शशिकांत पाटील आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
दरम्यान राजकारणाबरोबरच आपापल्या भागातले प्रश्न सोडवण्याकरता आपण कार्यतत्पर राहायला हवं. सत्तेचा वापर हा सर्वसामान्यांच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी करायचा असतो, याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. विकास साधायचा असेल तर राज्यात आणि केंद्रात तुमच्या आमच्या विचारांचं सरकार असलं पाहिजे, राज्याला विकासाच्या बाबतीत गतिमान करणं अशी भावना आ अनिल पाटील यांनी व्यक्त केली.