अमळनेर : अधिकाऱ्यांच्या चुकीने मॅपिंग झालेल्या गटाचा समावेश भूमिअभिलेख मध्ये गेल्याने अनेक वर्षे मालमत्ता पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड ) न मिळणाऱ्या नागरिकांना अखेर खासदार स्मिता वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या आदेशाने सात बारा उतारा मिळाला आहे.
येथील शिरूड नाका परिसरातील सुमारे ६१ नागरिकांच्या गट नम्बर १४४३/१ मध्ये ३१ मालमत्ता होत्या. हा गट भूमापन हद्दीत येत असल्याचे मॅपिंग मध्ये दाखवून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १२२ नुसार सिटी सर्व्हे आणि गट क्रमांक अशी दुहेरी नोंद पद्धत बंद करावी असे आदेश भूमिअभिलेख चे उपअधीक्षक बी सी अहिरे यांनी दिले होते. मात्र या प्रकारात हा भाग भूमापन हद्दीत गेल्याने तलाठी उतारा देत नव्हते आणि भूमिअभिलेख कार्यालयाकडून देखील मालमत्ता पत्रिका दिली जात नव्हती. या भागातील नागरिकांना स्वतःची जागा असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आई जेवू घालिना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था निर्माण झाली होती. महसूल कार्यालयात अनेकदा चकरा मारूनही कोणी दाद देईना. कर्मचारी आदेशाचे पालन करीत असल्याने निर्णय कोणी घ्यावा असा प्रश्न उपस्थित होता. अखेरीस खासदार स्मिता वाघ संतापल्या त्यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या कार्यालयात भूमिअभिलेख चे उपअधीक्षक , तहसीलदार ,तलाठी यांची संयुक्त बैठक घेतली. गट नम्बर १४४३/१ हा भूमापन हद्दीत नसल्याने सिटी सर्व्हे उतारा दिला जात नव्हता. तर जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांनी पाठवलेल्या यादीच्या संदर्भानुसार सात बारा मिळत नव्हता. चर्चेअंती देखील भूमिअभिलेख अधिकारी ऐकायला तयार नसल्याने खासदार स्मिता वाघ चांगल्याच संतापल्या त्यावर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली की जर हा गट सिटी सर्वेच्या हद्दीत येत नाही तर तसे लेखी द्या मग आम्ही आमच्या पद्धतीने सात बारा देऊ. त्यावर भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी चूक मान्य करत कलम १२२ च्या हद्दीत त चुकून मॅपिंगमुळे गट १४४३ /१ चा समावेश झाला होता. आणि दुहेरी नोंद पद्धत बंद करण्याच्या यादीत या नागरिकांचा समावेश करण्यात आला असल्याची कबुली दिल्याने. नितीनकुमार मुंडावरे यांनी नगर भूमापन हद्दीत येत नसलेल्या मालमत्तेचा सात बारा पुन्हा सुरू करण्याबाबत ग्राम महसुल अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत असे आदेश तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना दिलेत. त्यानुसार शहर तलाठी सोनवणे यांनी सर्वे करून त्या सर्व ३१ मालमत्तांची सात बारा मध्ये नोंद घेतली आहे.
त्यामुळे शिरूड नाका परिसरातील सुनंदा पाटील ,अश्विनी चौधरी , भगवान चौधरी , मयूर चौधरी ,रिता चौधरी , सरलाबाई चौधरी , रणजित पाटील , मालतीबाई पाटील ,बेबाबाई पाटील , राकेश पाटील , गणेश बाविस्कर , प्रकाश चौधरी , निशा पाटील , चंद्रकांत सोनार , प्राणिता पाटील ,योगेश पाटील , सुधीर पाटील , सुनीता चव्हाण , बापू पाटील , प्रमिलाबाई चौधरी , जगदीश बारी ,मनोहर बारी , नामदेव मिस्तरी , वसंत भावसार ,मुकुंद पिंगळे , गजानन ,भूषण ,हेमलता पिंगळे , भाईदास पाटील , वसंत बडगुजर , अशोक पाटील ,कैलास पाटील ,तुळसाबाई पाटील , सुनंदाबाई पाटील , सुरेखाबाई पाटील ,अनुसयाबाई माळी , अशोक करस्कर , चंद्रकांत करस्कर , भारती महाजन , मनीषा महाजन ,रत्ना महाजन , पुंडलिक महाजन , बंडू उद्धवरेषे , शिवाजी पाटील ,भैय्यासाहेब पाटील , रंगराव पाटील ,अरविंद कासार , प्रवीण चौधरी ,सुभाष भावसार , अनिता सूर्यवंशी ,पंकज सूर्यवंशी , प्रशांत सूर्यवंशी , सुशिलाबाई सूर्यवंशी , सुनीता सूर्यवंशी ,मुरलीधर धनगर , विमलबाई शिंपी , लताबाई खोपडे , सुनंदा सोनवणे याना न्याय मिळाला आहे.