लोक न्यूज
अमळनेर : विधानसभा मतदार संघातील  देशसेवेत असणाऱ्या ९८४ सैनिक तथा त्यांच्या कुटुंबियांसाठी इलेक्ट्रॉनिक्स ( इटीपीबीएस) मतपत्रिका पाठवण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली. तर शुक्रवार पासून होम वोटिंग सुरू करण्यात आले आहे
     देशसेवेतील सैनिक आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या कुटुंबियांना मतदान करता यावे म्हणून त्यांच्यासाठी  त्यांच्या कार्यालयात इलेक्ट्रॉनिक्स मतपत्रिका पाठवण्यात येतात. सैन्यदलाच्या मुख्य कार्यालयात पाठवल्यानंतर मतपत्रिका डाउनलोड करून घेतल्या जातात.  त्यासोबत संबंधित सैनिकाला संदेश  पाठवले जातात. त्यानंतर कार्यालय प्रमुखांच्या मदतीने त्या इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकेची प्रिंट काढून  संबंधित कर्मचार्यांकडून ओटीपी मागवून मतदान केले जाते. आणि त्या मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागवल्या जातात.

अशी असते इटीबीपीएस मतपत्रिका

इलेक्ट्रॉनिक्स मतपत्रिकेवर उमेदवारांचे मराठी आणि इंग्रजी भाषेत  नाव आणि त्यांचे फोटो असतात. तसेच त्यांच्या पक्षाचे  नाव असते त्या मतपत्रिकेवर चिन्ह नसते. मतपत्रिका ऑनलाईन सॉफ्टवेअर ने पाठवली जाते. परत येताना मात्र पेपरवर येते.

तसेच शुक्रवार दि.8 नोव्हेंबर पासून ८५ वर्षावरील व दिव्यांग मतदारांसाठी होम वोटिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी १० पथके नेमण्यात आले आहेत. मतदारांच्या सोयीनुसार व वेळेनुसार त्यांचे मतदान घेतले जाणार आहे.