लोक न्यूज-
रक्तदान शिबीर आणि विविध पुरस्काराचे वितरण.

 भारताचे जगप्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटां यांचे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने सेल्फी पॉइंट तयार करावेत.

कार्यक्रमाचे आयोजक इंडीया मीडिया लिंक अँड इव्हेंटस् मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक, ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक के.रवि.दादा  यांची मागणी
------------------------------
मुंबई | लोक न्यूज
 भारताचे जगप्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटा यांचा ८६ वा वाढदीवस मुंबईतील माटूंगा येथील येशवंतराव नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंडीया मीडिया लिंक अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर के. रवि (दादा)
यांनी वाढदिवस सोहळ्याचे आयोजन केले होते.

स्वामी बिजवनदास गुरुजी,पूर्व पोलिस ऑफीसर धनराज वंजारी, अभिनेता अल्ली खान प्रसिद्ध शायर सागर त्रीपाठी, ॲड.सुभाष सुर्वे, सुशील जाधव, समाजसेवक. आरीफ भाई आदि उपस्थित होते.

शरक्तदान शिबीर आणि विविध पुरस्काराचे यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.

भारताचे जगप्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटां यांचे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने सेल्फी पॉइंट तयार करावेत अशी मागणी या वेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक इंडीया मीडिया लिंक अँड इव्हेंटस् मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक, ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक के.रवि.दादा  यांनी केली आहे.

कार्यक्रमात सागर त्रिपाठी धनराज वंजारी,सुर्वे निवेदक उमेश कामत अनेकांनी रतन टाटांसह के रवि दादांचे आपल्या भाषणात भरभरून कौतुक केले.

 दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच रतन टाटांजीनवर लिहिलेल्या गाण्याचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले.

पहिल्यांदाच रतन टाटांवर मुशहरा, कविता व प्रसिद्ध हास्य कलाकार दिवेश शिवडकर मार्फत रतन टाटांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

 कार्यक्रमाचे आयोजक के.रवि दादां यांनी उपस्थितांना मीडियांच्या माध्दमातून देशाला सामाजिक संदेश देताना जनतेस आव्हान केले २८ डिसेंबर रोजी रतन टाटांच्या वाढदिवसा निमित्त फक्त १० मिनिटे जनतेने आप आपल्या घरातील लाईट बंद केल्या तर देशामध्ये अर्बो युनिट विजेची बचत होईल आणि टाटा पावरची निदान मुंबई शहाराला स्वस्तात विज मिळेल. रवि दादां यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदींना विनंती केली आहे की येणाऱ्या वर्षांत रतन टाटांचा वाढदिवस देशाने सामाजिक पातळीवर वेग वेगळ्या स्वरूपात साजरा करावा अशी मागणी के.रवि दादा यांनी केली आहे.

यावेळी  डॉ. विजय सानप, राहुल रवि, राम तांबे, पत्रकार राजेंद्र साळसकर, विलास घडशी,पत्रकार तानाजी कांबळे, शरद रणपिसे,प्रभाकर  वडियार, प्रो. हेमंत सामंत, नितीन जाधव, दिपक पडीये,डॉ. रतन पवार,रमजान शिद्धिकी, विक्रांत कशप्प. राहुल खैरे, राज्या सोनटक्के, आदीनी विषेश मेहणत घेतली.