लोक न्यूज-
" ज्यांनी भारताला क्रांतिकारी विचार देऊन भगिनींना ज्ञानामृत पाजले अशा ज्ञानयोगिनी,ज्ञानगंगोत्री सावित्रीआई पासून आजच्या स्रियांनी प्रेरणा घेऊन सर्वच क्षेत्रात पुढाकार घेतला पाहिजे आणि समाजाची मानसिकता बदलविण्याचा प्रयत्न केला पाहिजे "असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रकाश माळी सर यांनी श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ,मुंबई यांच्या वतीने सावित्रीआई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.माळी समाज भवन,उल्हासनगर-४ येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात मंडळाच्या कार्यकारी सदस्या रजनी प्रकाश माळी,महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा यशोदा भीमराव माळी व विद्यमान अध्यक्षा रेखा मुरलीधर महाजन यांच्या शुभहस्ते सावित्रीआई फुले,महात्मा जोतिबा फुले व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मंडळाचे सल्लागार दिलीप सुकदेव माळी व कार्यकारी सदस्य संभाजी पुंडलिक माळी,महिला मंडळाच्या उपाध्यक्षा पुष्पांजली कैलास महाजन,सचिव शारदा पंकज माळी,सदस्या मंगला भागवत शेलकर तसेच रेखा दिलीप माळी,पुष्पा चिंतामण महाजन,सुरेखा सोपान महाजन,शुभांगी जितेंद्र माळी,अनिता पांडुरंग चौधरी,योगिता भरत माळी,सुरेखा गजानन महाजन,कविता विजय महाजन,कमलबाई रामकृष्ण महाजन व डॉ.राजेश साहेबराव माळी यांनी प्रतिमा पूजन करून सावित्रीआईंना विनम्र अभिवादन केले.या प्रसंगी मुंबई मंडळाच्या कार्यकारी सदस्या सौ.रजनी प्रकाश माळी व महिला मंडळाच्या सचिव शारदा पंकज माळी यांनी सावित्रीआईचे गुणगान करणाऱ्या कविता सादर केल्या.या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.प्रकाश माळी सर यांनी केले.
