अमळनेर- लोक न्यूज
ता.१० मार्च रोजी, अमळनेर येथे महिला मंच ट्रस्ट, यांनी महिला दिनानिमित्ताने  स्पर्धा व मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी माहिलांच्या विविध स्पर्धा या घेण्यात आल्या.  यात " पौष्टिक नाश्ता डिश", स्पर्धेत सहा महिलांना बक्षिसं देण्यात आली.
 यात प्रथम क्रमांक -भक्ती मुंदडा ,द्वितीय क्रमांक -सोनाली जैन यांना देण्यात आले .ह्या स्पर्धेचे सर्व बक्षिसे लिनेस क्लब यांचे तर्फे  लिनेस अध्यक्षा सौ शारदाताई अग्रवाल व सचिव सौ कल्पनाताई मुंदडा यांनी दिली.

महिलांना मार्गदर्शन--
          "वाढत्या वयातील ढासळणारे सौन्दर्यास पुनरूज्जिवित करण्यासाठी खास घरगुती उपाय या विषयावर सौ.नीताताई अविनाश सोनार यांनी सुंदर व सोपे घरगुती उपाय सांगुन मार्गदर्शन केले. सौ. नीताताई ह्या स्वताहा  "मास्टर आँफ फाईन आर्टस  " या विषयात गोल्ड मेडलिस्ट असुन एक ऊत्कृष्ट चित्रकार आहे.  लिनेस क्लब तर्फे सौ. नीताताई यांचा व सर्व अमळनेर महीला मंचातील पदाधीकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.   कार्येक्रम यशस्वीतेसाठी डाँ. अपर्णाताई मुठ्ठे , कांचनताई शाह , सरोजताई भांडारकर व डाँ. मंजुश्री जैन आदींनी परीश्रम घेतले. याप्रसंगी कार्येक्रमास बहुसंख्येने महीला उपस्थीत होत्या.