लोक न्यूज-
आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे हे सर्वांना माहीतच आहे .विज्ञानाच्या आविष्कारामुळे आपले जीवन सरल व सोयीस्कर झाले आहे. जगभर विज्ञान दिन हा साजरा होतो. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान या विषयाबद्दल आवड व रुची निर्माण करणे हे उद्दिष्ट त्यामागचे आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे तसेच वैज्ञानिक क्षेत्रातील नवीन प्रयोगांना प्रेरणा देणे हा आहे. अशाच पद्धतीने जि. प. शाळा निकुंभे ता.जि.धुळे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला .त्यात इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांनी घनतेचा परिणाम, पाण्याचा पृष्ठीय ताण अशा प्रकारचे प्रयोग प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविले..त्यात सहभागी विद्यार्थी अल्ताफ शहा फकीर ,नैतिक आनंदा पाटील, यज्ञेश मोहन पाटील या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका जयश्री वसंतराव बोरसे यांच्या मदतीने मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखविले. या प्रयोगाचे मुख्याध्यापक अशोक पाटील सर यांनी कौतुक केले व शाबासकी दिली.