लोक न्यूज-
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ यांच्या वतीने मंत्रालय मुंबई येथे ९ मार्च रोजी सुमारे ४० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन राजाध्यक्ष विलास भाऊ कुमरवार तथा राज्य सचिव गिरीष भाऊ दाभाडकर यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले आहे. त्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कामगार कायद्यानुसार १० ऑगस्ट २०२० चे अधिसूचनेनुसार सुधारित वेतन दराने अनुदान मिळावे तरी सदर विषय १७ ते १८ महिन्यांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा ग्रामविकास मंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून वित्त विभागात लक्ष देतो असे आश्वासन दिले. परंतु त्याची आज तागायत पूर्तता झालेली नाही. नगर परिषद व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करणे, निवृत्ती वेतन व उपदान योजना लागू करणे, आकृतिबंधात सुधारणा करणे ,कर्मचाऱ्यांवर लावलेली वसुलीची अट रद्द करणे व शंभर टक्के अनुदान देणे, आकृतिबंधात सुधारणा करणे व यावलकर समितीचा अहवाल लागू करणे. या व इतर मागण्या संदर्भात ९ मार्च च्या मुंबई मंत्रालया वरील निर्धार मोर्चा मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन युनियनचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील सचिव प्रदीप महाजन यांनी केले आहे.