लोक न्यूज-
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे शिवजयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम घेऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव प्रा शाम पाटील, प्राचार्य विकास चौधरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी संपूर्ण देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ९वी व १०वी तील ६३ विद्यार्थ्यांना कोरोना लस देण्याचा दुसरा टप्पा पार पडला. लसीकरण मोहिमे साठी अमळनेर वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन ,प्रसाद क्षीरसागर, वंदना पाटील व शितल बोरसे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.