लोक न्यूज-
अमळनेर खा.शि.मंडळाच्या जी एस हायस्कुल मध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमा पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.यावेळी कार्यक्रम अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दादासाहेब डी एच ठाकुर सर होते.यावेळी पर्यवेक्षक आर एल माळी सर बी एच पाटील सर, विद्यार्थी संघ प्रमुख ए डी भदाणे सर , एन एम भारती सर , के एस गायकवाड सर , शिक्षकेतर प्रतिनीधी पंकज जैन , वामन चव्हाण , क्रीडा विभाग प्रमुख एस पी वाघ सर उपस्थित होते.यावेळी महाराजांच्या कार्याविषयी श्रीमती व्ही जे पाटील मॕडम व श्री.अमित पाटील सरांनी आपल्या भाषनातुन उल्लेख केला. संपुर्ण कार्यक्रमांचे सुत्रसंचलन एम ए पाटील सरांनी केले. घरुन विद्यार्थी नी आॕनलाईन भाषने सुध्दां दिली.