लोक न्यूज-
अमळनेर : चाळीसगावच्या गुन्ह्यात फरार असलेला अमळनेरच्या दाऊद ने शहरात एकाच्या खिश्यातून पैसे हिसकावून घेतल्याने पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
शुभम उर्फ दाऊद मनोज देशमुख याने चाळीसगाव येथे आठ जणासोबत एक गुन्हा केला आणि त्यात तो फरार होता. २ रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता दीपक पुंडलिक बडगुजर हा त्याच्या पत्नी सोबत जात असताना शुभम याने त्याच्या खिशातून बळजबरीने साडे सहाशे रुपये हिसकावून घेतले. शुभम याने यापूर्वीही अमळनेर शहरात अनेक गुन्हे केले आहेत. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना शुभम अमळनेरात आल्याची माहिती मिळताच यांनी पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील , सुनील हटकर ,दीपक माळी , अमोल पाटील , राहुल पाटील ,गणेश पाटील , रोहिदास आगोणे ,सागर साळुंखे याना प्रताप मिल कंपाऊंड मध्ये पाठवले असता दाऊद ने कंपाऊंड वरून उडी मारली आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याच वेळी रोहिदास आगोने,सागर साळुंखे , मिलिंद भामरे ,सूर्यकांत साळुंखे यांनी त्याला पकडले. तर दुसऱ्या पथकाने दाऊद चा मित्र लोण येथील राहुल वानखेडे यालाही ताब्यात घेतले. दोघांना ३ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सूनवाल्यांनंतर पोलिसांनी दाऊद व त्याच्या साथीदारास कोर्ट ते शाहू महाराज चौक पर्यंत पायी नेले.