अमळनेर प्रतिनिधी-
झाडी येथील शिवाजी सुकलाल देवरे यांनी आपल्या शेतात दोन एकर मका पेरला असून डुकरांनी मोठ्या प्रमाणत केलेली नासधूस...
डुकराचे मालक गलवाडे येथील बापू आनंदा पवार यांना वेळोवेळी तोंडी सांगितले असता. तरी सुद्धा लक्ष देत नसून झाडी ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आपली मनमानी करत झाडी येथे वराह मोठ्या प्रमाणात सोडून जात आहे. व शेतकऱ्याचा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गावातही वराहांचा मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ असतो.तरी अमळनेर पं.स.गटविकास अधिकारी,
अमळनेर तहसीलदार
अमळनेर प्रांताधिकारी,
यांनी या घटनेची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी अपेक्षा झाडी परीसरातील नागरिकांनी केली आहे.