लोक न्यूज-
आज रोजी अमळनेर येथे विश्वकर्मा जयंती निमित्त सामाजिक सभागृहाचे उदघाटन जि.प.सदस्या सौ.जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित नगरसेविका सौ.गायत्री पाटील,एल.टी.पाटील,दिपक पाटील,आयोजक म्हणून श्री.विश्वकर्मा मंडळ,सर्व कार्यकारणी सदस्य,अमळनेर जिजाऊ नगर,रेऊ नगर,सहकार नगर,वृदावन नगर,ढेकू रोड परिसरातील नागरिक व समाज बांधव उपस्थित होते. मागील पाच वर्षात समाजाचे विष प्रत्येकाच्या मना मध्ये पेरले गेल.एक संघाने राहू तेव्हाच अमळनेरची प्रगती होईल,पाडळसरे धरणाचे पाच वर्षात दोघे आमदारांनी बोर्ड आणि बॅनर बाजी करण्याचे काम केली.दादा आमदार बनल्या पासून धरणाचे काम सुरळीत सुरु झाले.पंचवीस वर्षे अनिल दादांनी अमळनेर तालुक्याची पाईपिट केली आहे. म्हणूनच तालुक्याच्या माणसाला सर्व समस्याची जाण आहे,तेवढी बाहेरच्या माणसाला जाण नसते,म्हणून परत चूक करू नका तालुक्याच्या माणसाला मतदान करा आपण जर नंदुरबार गेलो तर निवडून येणार का?आपली हिम्मत होईल का जाण्याची आपण का बाहेरच्या माणसाला एक्सेप करायचे?
जसा आहे तसा तो आपला आहे असं म्हणून चालू द्यायचे जयश्रीताई या कार्यक्रमाच्या वेळी बोलतांना म्हणाले.