.       मा.आमदार डॉ. बी.एस.पाटील


लोक न्यूज

सुमारे तीनटम आमदार राहिलेले डॉ. बी.एस.पाटील यांच्या कार्यकाळात मतदारांना पैस्याचे प्रलोभन दाखवले जात नव्हते त्यामुळे कार्यकर्ते एकत्र होते.याच्या कार्यकाळात भाजपाची शक्ती वाढली होती.पाडळसरे धरणाची निव त्यांनी पाडली मात्र त्यानंतर अमळनेरच्या राजकारणात अर्थ येऊ लागला त्यामुळे डॉ. बी.एस.पाटील हे रुग्णसेवा करण्यात मग्न झाले.



    मा.आमदार साहेबराव धोंडू पाटील


प्रत्येक वार्डात अर्थपूर्ण विकास कामे करून लोकांना आपल्या कडे वळवून घेतले जो व्यक्ती आपल्या गावाचा सरपंच राहतो अश्या साहेबराव पाटील यांनी आमदारकीची माळ गळयात घातली प्रचंड पैसा खर्च करून लोकांना त्यांनी आपलेसे केले.तर अर्थपूर्ण जीवावर त्यांनी कार्यकर्त्यांचा फौजफाटा जमविला अमळनेरच्या मतदारांना त्यांनी परिवर्तनाची वाट दाखवली आणि अमळनेर बिकाऊ आहे हे त्यांनी सिद्ध केले.
        याचा अर्थ मतदारांना प्रलोभन देऊन निवडणूक जिकण्याचा पायंडा त्यांनी पडला.



        मा.आमदार शिरीष चौधरी


साहेबराव पाटलांची पद्धत वापरून शिरीष चौधरी आमदार झाले यांनी लोकांना आपलेसे करून अनेक विकास कामे केली साहेबराव पाटलांची अनेक कार्यकर्ते ओढुन त्यांनी आपल्या गोटात सामील करून घेतले.याचा परिणाम म्हणून शिरीष चौधरी हे आमदार बनले मात्र विरोधकांनी त्यांच्यावर विकत घेतल्याचा ठपका ठेऊन अमळनेर बिकाऊ आहे.हे लोकांच्या मनात भरून दिले.तर राजकारण व समाजकारणाची मेळबसून त्यांचा पराभव केला.कधी नव्हते ती विकास कामे त्यांच्या कार्यकाळात झाली.त्यामुळे लोकांच्या मनात त्यांनी आपला ठसा उमटविला.




            आमदार अनिल पाटील

शिरीष चौधरी यांच्याशी प्रचंड टक्कर देऊन आमदारकीची माळ गळ्यात घातलेले अनिल पाटील हे अमळनेरच्या राजकारणात भूमिपुत्र म्हणून उदयास आले.त्यांनी प्रचंड जाहीर सभा घेवून लोकांची मने आपल्या कडे वळविली शिरिष चौधरी हे परके असून खरे भूमिपुत्र आपण आहोत हे लोकांना पटवून दिले.त्यांनी अमळनेर च्या लोकांना बिकाऊ म्हणून हिनविले परिणामी लोकांच्या मनात अर्थपूर्ण प्रलोभन टाळले तर त्यांनी अनेक विरोधकांना एकत्र करून,समाजकारण करून आमदार म्हणून निवडून येऊन एक पॉवरफुल व्यक्ती म्हणून सिद्ध केले.

अमळनेरला बिकाऊ म्हणून ठपका ठेवणारे सुरवात करणारे साहेबराव पाटील यांनी स्वतः अर्थपूर्ण सहकार्य करून निवडून आले.तर दुसऱ्याची मुसळ बघणारे साहेबराव पाटील यांना मात्र आपल्या दारतील कचरा दिसला नाही परिणामी त्यांना पराभवास सामोरे जावे लागले त्याची परंपरा पुढे चालत राहून अमळनेरला बिकाऊ हा ठपका रूढ झाला. काहीच विकास कामे न करता अमलनेरला विकत घेता येते हे काहींनी सिद्ध केले.तर ही परंपरा पुढे चालत राहून येणाऱ्या न पा निवडणुकीत अमळनेर विकले जाते का? हा प्रश्न राजकीय पटलावर पहाणे महत्वाचे ठरेल....