लोक न्यूज-
अमळनेर : घराच्या वाटणीच्या भांडणात पत्नी ने पतीची बाजू घेतली नाही म्हणून रागाच्या भरात पती घरातून निघून गेल्याची घटना १४ रोजी दुपारी २ वाजता गोवर्धन येथे घडली.
     बाबुराव मंगा भिल व जंगलू बटन भिल यांचे १३ रोजी रात्री ८ वाजता  घराच्या वाटणीवरून भांडण झाले त्यावेळी जंगलू भिल यांनी बाबूरावच्या तोंडावर चापटांनी मारले. तेव्हा त्यांची पत्नी कल्पनाबाई यांनी बाबुराव ला घरात बोलावून घेतले. १४ रोजी दुपारी २ वाजता बाबुराव याने संतापात त्याच्या पत्नीला सांगितले की मी तुमच्यासाठी हिस्सा मागत आहे आणि तू भांडणात माझी बाजू घेतली नाही असे सांगून घरातून निघून गेला. १७ रोजी त्याच्या पत्नीने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.