लोक न्यूज- महेंद्र गुरव,तळोदा


जय आदिवासी युवा शक्ती, गावकरी, व विदयार्थी, विदयार्थीनी यांचा वतीने कोरोना काळापासून बंद करण्यात आलेली  तळोदा ते सिलिंगपुर/छोटा धनपुर  ही MSRTC बस सेवा सुरु  करण्या समंधी तळोदा /अक्कलकुवा आगार प्रमुख  यांना 12/10/2021 रोजी निवेदन देण्यात आले.  महाराष्ट्रात सर्वत्र शाळा/कॉलेजेस सुरु झाल्या असुन आता कुठे ज्ञानगंगेचा फुलारा दिसू लागला आहे. शाळा /कॉलेज सुरु होऊन  तब्बल  2 आठवडे पुर्ण झालेत परंतु  तळोद्या तालुक्याचा ठिकाणी शिक्षण  घेणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांचे बस सेवा बंद असल्या कारणाने  शैक्षणिक नुकसान होत आहे. व गावकर्यांना खाजगी वाहनांना जास्तीचे प्रवास भाडे खर्च करावे लागत आहे. 
स.  9.45  तळोदा ते सिलिंगपुर/ छोटा धनपुर
दु.   5.20 तळोदा ते सिलिंगपुर/ छोटा धनपुर
  सुरु करावे.
     विदयार्थ्यांच्या, गावकर्यांचा अडचणी लक्ष्यात        घेऊन लवकरात लवकर बस सेवा सुरु करावी.
     जयस जिल्हा अध्यक्ष - विनोदभाऊ माळी,  उपअध्यक्ष विवेकभाऊ पाडवी,तालुका अध्यक्ष सुनील पाडवी, हिरामण वळवी, शिवाजी डोंगरे, इलामसिंग पवार,बेबीबाई मार्गे,छाया डोंगरे, रीना ठाकरे,सुरेखा वळवी, कविता पवार,संजय मोरे (जयस शाखा अध्यक्ष)  बबलू मोरे (जयस शाखा उपअध्यक्ष)   कांतीलाल ठाकरे (जयस शाखा सचिव ) प्रवीण मोरे (जयस सल्लागार ) तन्वीर कुरेसी , कपिल डुमकुल,सतीश मोरे,विनोद डोंगरे  यांचा  वतीने निवेदन देण्यात आले .