लोक न्यूज-
७५व्या भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त
विद्यार्थ्यांना लेखन साहित्य भेट
 जि.प.प्राथमिक शाळा खेडी बु ता अमळनेर जि जळगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. राकेश भीमराव पाटील यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला लेखन साहित्य यात पेन व वही भेट म्हणून दिले.
     याप्रसंगी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. समाधान पाटील,ग्रा.पं.सदस्य सौ.उज्वलाताई पाटील तसेच गावातील ज्ञानेश्वर पाटील ,प्रविण पाटील, पंडीत पाटील, रोहिदास पाटील, यादव पाटील, दिलीप पाटील, सुदाम पाटील,सुभाषसिंग परदेशी, दिलीप परदेशी, गणेश पाटील, अजय बैसाणे,डिगंबर पाटील, पिरन भील,गोकुळ पाटील ,अंगणवाडी सेविका सौ.शोभा पाटील, अलकाबाई पाटील आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री. किरण मोहिते यांनी केले व मुख्याध्यापक  श्रीमती भारती चौधरी यांनी मान्यवरांचे आभार मानले.