लोक न्यूज-
महाराष्ट्र दारूबंदी महीला/ युवा मोर्चा ढयासिंग कार्यकर्त्या असून                  दि. 22/8/2021 रोजी रक्षाबंधन निमीत्ताने अमळनेर तालुक्यातील मुडी मांडळ गावातील तरूण कार्यकर्त्यांच्या कळकळीच्या विनंती वरून धुळ्यावरून 40 किलोमीटर लांब असलेल्या मुडी मांडळ गावात संध्याकाळी ५ वाजता पोहचले... गीतांजली ताई पुढे म्हणालेकी,
महीलांना खूप आनंद झाला वाल्या सेनेचे सर्वच कार्येकर्ते अगदी प्रत्येक ठिकाणी पटापट कार्यरत होतात.... 
ताई आली म्हणून किती उत्साह कार्यकर्ते अगदी डँशीग.... महीलांची दारूबंदी ची मिटींग घेतली सर्वच समस्या जाणून घेतल्या कोणी विधवांचे प्रश्न कोणाचे घरकुल नाही असंख्य प्रश्न त्यांना सोडवण्यासाठी उत्तरे देण्याचा माझा प्रयत्न दारूबंदी गावात व्हायलाच पाहिजे महीलांची तळमळ ... आमच्या गावात ताई आतापर्यंत कोणी असे कोणती माहिती सांगत नाही ताई म्हणून माझ्या बद्दलची त्यांची आस्था प्रेम कितीतरी त्यांची समजूत घालत धीर देत, मार्गदर्शन करत महिलांमध्ये हिम्मत निर्माण करण्यात मी यशस्वी झाले.... सर्व महीला उठल्या स्वताचा उध्वस्त संसार रोखण्यासाठी उठल्या माझ्या सोबत दारूबंदी गावात करण्यासाठी सज्ज झाल्या आता सर्वजण मंगळवारी अमळनेर येथे येणार आहेत.... 
पुन्हा आज एका नवीन गावात माझ्या महीला भगींनींमध्ये दारूच्या विरुद्ध लढण्याची मशाल पेटवून मी माघारी फिरले..

सौ गीतांजली कोळी
 महाराष्ट्र दारूबंदी महीला/ युवा मोर्चा-प्रमुख