अमळनेर-लोक न्यूज
सडावण ता.अमळनेर----येथील गावात गेल्या सोमवार दि.१६रोजी रात्रीच्या वेळी गावात चोरानी चोरी करण्याच्या बेतात आलेले असताना त्यांनी त्यादिवशी येथील गोविंदा रतन पाटील यांच्या घरात मागील दरवाजा तोडून कपडे ,बैग,रोकड मध्ये सहा हजार रूपयांची चोरी केली.दुसऱ्या दिवशी पुंडलिक उत्तम पाटील यांच्या घरी ही चोरानी दरवाजा तोडला असता स्वयंपाक रुममधील डाळी, धान्य आदी डबे मधील साहित्य एकत्र करुण नुकसान केले.मात्र बेडरूम मध्ये झोपलेले जाग आल्याने त्यांनी तेथून पळ काढला. मात्र तिसऱ्या दिवशी ही चोरानी पुन्हा गावात असलेली दूध डेअरी मध्ये कुलुप तोडले मात्र याठिकाणी काहीही मिळून आले नाही. यामुळे गावात सतत तीन दिवस चोर आल्याने गावातील लोकांनी घाबरून रात्रीच्या गस्तीला सुरुवात केली आहे.
सडावन येथे ग्रामस्थाचा जागते रहोचा नारा---------- गावात लागोपाठ ता.१६,१७,१८ या तारखाना चोर आढळून आल्याने लोकांनी घाबरून रात्रीची टप्पा-टप्याने गस्त घालन्यास सुरुवात केली आहे.ग्रामस्थाच्या सांगण्यानुसार गावापासुन काही अंतरावर चारचाकी वाहन येत असून त्यांना सोडून पुन्हा ते निघुन जात असल्याचेही सांगण्यात आले.यात लागोपाठ चार दिवस चोर आढळून आल्यावर ही गावातील लोकांनी पोलीसात याबाबत अजुनही नोंद दाखल करण्यात आली नसल्याची माहिती येथील श्री.राजू पाटील सर यांनी सांगितली.
-राजू पाटील (ग्रामस्थ)
गेल्या आठवड्यात चार दिवस चोरानी आमच्या गावात धुमाकुळ घातल्याने ग्रामस्थानी रात्रीची गस्त सुरु ठेवल्याने गुरुवारी दि. १९ रोजी चोरी करण्यासाठी आलेले चोराना ग्रामस्थानी रात्रीची गस्त घालताना नजरेस पडल्याने पळवून लावले .मात्र गावातील स्री आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.