लोक न्यूज-
अमळनेर -आधीच तरुणांची मोठी फौज असलेल्या अमळनेर शहर व तालुका भाजपात भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून माजी आ प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ व युवा मोर्चा प्रदेश सचिव सौ भैरवी वाघ पलांडे तसेच तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील व शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या इंनकमिंग ची मालिका सुरू झाली असून यानिमित्ताने तरुण वर्ग भाजपकडे वळत असल्याचे सिद्ध झाले आहे.
          लोकमान्य स्कुल जवळील टाऊन हॉल मध्ये आयोजित भाजयुमो च्या सोहळ्यात ग्रामिण भागच नव्हे तरुण शहरातून देखील प्रवेश घेणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती यावेळी सुरवातीला भाजप युवा मोर्चाच्या ग्रामीण व शहर नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकारीना  नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले,त्यानंतर प्रवेशासाठी तरुणांची झालेली मोठी गर्दी व त्यांचा उत्साह पाहता स्मिता वाघ यांनी आधी प्रवेश सोहळा उरकण्यास प्राधान्य दिले,बघता बघता शहर व ग्रामीण भागातील शेकडो तरुणांची प्रवेशासाठी रिघच लागली प्रत्येकाला सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामीण भागातील हिंगोणेखुर्द,वाघोदे,मंगरूळ,मुडी,जानवे,सारबेटा,इंद्रापिंप्री,फाफोरे,रणाईचे,जैतपिर,पिंपळे,नांदगाव,कावपिंप्री,खडके,हेडावे,कळंबू,एकलहरे,पाडसे,मांडळ,गोवर्धन,रामेश्वर, मालपूर, ढेकू,शिरसाळे,निम तसेच शहरातील माळी वाडा,साने नगर,ताडेपुरा,पैलाड, पानखिडकी,वड चौक,भोई वाडा, पटवारी कॉलनी,इस्लाम पुरा,राजाराम नगर,शिरूड नाका,अयोध्या नगर,ढेकू रोड,पिंपळे रोड,आर के नगर आदी भागातील युवकांनी भाजपा युवा मोर्चा मध्ये प्रवेश केले
        याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख,माजी सभापती श्याम अहिरे,जि प सदस्या सोनू भिल,संगीता भिल,प्र. जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा राकेश पाटील,सरचिटणीस जिजाब पाटील, राहुल पाटील,महेंद्र महाजन,दिलीप पाटील,संजय पाटील,राहुल पाटील,सौ किरण पाटील,महेंद्र सर,चंद्रकांत कंखरे,डॉ संजय शाह,भटक्या विमुक्त जाती देवा लांडगे,मॅचिंद्र राजपूत,महेश पाटील,दिपक पवार,मुन्ना कोळी,शेखर कुलकर्णी,युवा मोर्चा ताअध्यक्ष शिवाजी राजपूत,शहरअध्यक्ष पंकज भोई, सरचिटणीस विलास पाटील,रवि पाटील,राहुल चौधरी, भूषण पाटील,समाधान पाटील,रवि ठाकूर,आयज बागवान,युवती प्रमुख हर्षदा बडगुजर उपस्थित होते,यावेळी स्मिता वाघ यांनी अनमोल मार्गदर्शन केले.