एक वृद्ध महिला आपल्या अल्पवयीन नातीला मुलीला भेटायला घेऊन जाण्यासाठी बसस्थानकावर आली असताना त्या मुलीने लघुशंकेला जाऊन येते असे सांगून मुलगी गायब झाली. आजी व नातेवाईकांनी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ती मुलगी मोटरसायकल क्रमांक एम एच १८ बी पी ९३०७ वर एका तरुणाबरोबर निघून गेल्याची माहिती मिळाली. ही मोटरसायकल गोपीचंद बारकू पवार रा डाबली धांदरने ता शिंदखेडा या तरुणाच्या ताब्यात होती आणि काही दिवसांपूर्वी याच मुलाने तरुणीला पळवून नेणार असल्याचे वक्तव्य केले होते असे आजीने संगीतल्यावरून आजीने अमळनेर पोलीस स्टेशनला गोपीचंद पवार यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस नाईक दीपक पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून मुली पळवण्याचे व पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पोलीस नाईक दीपक माळी , डॉ शरद पाटील , रवी पाटील , हितेश चिंचोरे यांच्या पथकाला गोपनीय माहितीवरून आरोपीच्या मागावर पाठवले. आरोपी देवळा तालुक्यात गेल्याचे समजले तेथे काही स्थानिक लोकांच्या मदतीने तो वाझगाव येथे शेतात लपला असल्याचे समजताच पथकाने त्याला व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. दोघांना अमळनेर आणल्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलीला पळवण्यासाठी आणखी दोघांची मदत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे मुलीच्या जाबजबाबवरून आरोपी विरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अमळनेर :- बसस्थानकावर आजी सोबत आलेल्या अल्पवयीन मुलीला मोटरसायकलवर पळवून नेणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील तरुणाला मुलीसह अमळनेर पोलिसांनी चांदवड तालुक्यातून शेतातून ताब्यात घेतल...