लोक न्यूज-
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, शाळा आणि कॉलेज संदर्भात नोटीफिकेशनमध्ये आम्ही स्पष्ट केलेले आहे की, त्या त्या ठिकाणचा विभाग यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सक्षम राहील. परंतु एक नक्कीच आहे की टास्क फोर्सच्या सदस्यांनी शाळा, महाविद्यालयं सुरू करण्याबाबत विरोध दर्शवला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्स व शालेय शिक्षण विभाग यांच्याबरोबर आज बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत त्यांचा अंतिम निर्णय होईल, त्यामुळे शाळेच्याबाबतीत जो काही निर्णय आहे, त्याबाबात कदाचित आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत निर्णय होईल. याबाबत मुख्यमंत्री, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांची बैठक होईल. मी स्वतः उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांशी बोलल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की, प्रत्येक विद्यापिठाचे कुलगुरू व त्या विद्यापिठाच्या अंतर्गत येणारे जेवेढे काही जिल्हे आहेत. त्यांच्या शैक्षिण संस्थांसोबत चर्चा करून, ते दोन-चार दिवसात आरोग्य विभागाला त्याचा अहवाल देणार आहेत आणि नंतर त्याबाबत अंतिम निर्णय महाविद्यालयांसंदर्भात होईल.
तर, राज्यात करोनामुक्त भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आल्यानंतर आता शहरी भागांतील आठवी ते बारावीचे आणि ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्ग १७ ऑगस्टपासून सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांच्या, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या, शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.