लोक न्यूज- महेंद्र गुरव,तळोदा
तळोद्यातील माजी उपनगराध्यक्ष तसेच आक्रमक नेतृत्व म्हणून परिचित असणारे नेते माजी उपराध्यक्ष अनूप उदासी व गेल्या अनेक वर्षांपासून कट्टर शिव सैनिक म्हणून परिचित असलेले व शहरात संघटन टिकविण्यासाठी संघर्ष करणारे शहर प्रमुख जितेंद्र दुबे व शिवसेना स्थापना पासुन सोबत असणारे जेष्ठ नेते संजय पटेल , व भाजपाचा जिल्हाध्यक्षपदाला सोडचिठ्ठी देत
शिवसेनेत आलेले आनंद सोनार यांची एक गुप्त बैठक झाली असून यात काय चर्चा झाली हे अजून तरी गुलदस्त्यात आहे.
संभाव्य चर्चा अशी असू शकते की,
माझी शिवसैनिक अनुप उदासी
यांनी मागील न.पा निवडणुकीत ऐन वेळस शिवसेनेशी दुरावा करत भाजप पक्षा कडून कुटुंबातील सदस्यला उमेदवारी देत निवडणूक लढवली व जिंकली देखील
मात्र नंतर पालिकेत गटात सतत वैचारिक मतभेदांमुळे नाराजी असल्यामुळे त्याचा हा निर्णय असावा अशी चर्चा होत आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून देखील त्यांना निमंत्रण असल्याची कानभून आहे . परंतु अनुप उदासी यांनी प्रभागाची स्थिती पाहता नेमकं कुठं जायच असा प्रश्न पडला असतांना शेवटी "फिर वहि दिल लाय हू"असा गाजा-वाजा होत आहे.
याच सोबत अनुप उदासी यांचा प्रवेश कधी होईल ? कोण कोण सोबतअसणार? कुठे होईल? प्रवेश किती जोरदार असेल? यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.व अजूनही काही नेते मंडळी सेनेत दाखल होण्याची शकत्या वर्तवली जात आहे.