लोक न्यूज-
अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळात कनिष्ट महाविद्यालयात २०११ पासून बोगस पद दाखवून नोकरभरती केली आहे. शासनाची ५० लाखाची फसवणूक केल्याचा आरोप संस्थेचे सदस्य अरविंद वासुदेव साळुंखे यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत त्यांनी शिक्षण संचालक तथा उच्च न्यायालयातही तक्रार केली आहे.
अरविंद साळुंखे यांनी पुरावे दाखवताना सांगितले की मारवड येथील श्रीमती द्रौ.फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयात २०११ मध्ये योगेश काशीनाथ पाटील याना पायाभूत पदावर सरंक्षण शास्र व भूगोल विषयाकरिता शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करण्यात आले.प्रत्यक्षात २८ ऑगस्ट २०१८ रोजी शिक्षण उपसंचालक यांनी संस्थेला पद भरण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी अमान्य केली.आणि २०११ पासून ते १४ पर्यंत शिक्षण उपसंचालकांनी योगेश काशिनाथ पाटील यांची पायाभूत पदास मान्यता नाकारली आहे.आणि २०१३ मध्ये विदयार्थी संख्या नसल्याने ११वी ची तिसरी तुकडी रद्द केली होती. २०१८ मध्ये देखील शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी योगेश पाटील यांची नेमणुकीस मान्यता नाकारली आहे. तरी देखील संस्थेने योगेश पाटील यांचा पगार काढून सुमारे ५० लाख रुपये अनुदान लाटले आहे. व शासनाची फसवणूक केली आहे. यासंदर्भात अरविंद साळुंखे यांनी वारंवार माहिती अधिकारात माहिती मागितली तरी प्राचार्यांनी माहिती दिलेली नाही.शिक्षणाधिकारी , शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रारी करूनही त्यांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. यामुळे संस्थाचालक अरेरावीची भाषा वापरतात व तुमच्याकडून आमचे काहीच वाकडे होणार नाही असे बोलत असल्याचा आरोप अरविंद साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत करून संस्थाचालक व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.