लोक न्यूज -
एकात्मिक बाल विकास सेवा योजना,सीबीडी बेलापूर नवी मुंबईच्या आयुक्तपदी बदलीने नियुक्त झालेल्या श्रीमती रूबल अग्रवाल यांची संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती मायाताई परमेश्वर यांनी त्यांच्या दालनात आज भेट घेऊन संघटनेच्या वतीने सत्कार केला आणि निवेदन देऊन खालील ज्वलंत व महत्त्वाच्या असणाऱ्या विविध मागण्यांपैकी
अंगणवाडी सेविकांच्या शिक्षणाचा विचार करून पोषण ट्रॅकर एप्लिकेशन मध्ये अंगणवाडी केंद्राची माहिती भरण्यासाठी इंग्रजी ऐवजी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करण्यात यावा ही आग्रही मागणी केली.
तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाचे आणि जास्त क्षमतेचे मोबाईल देण्यात यावेत तसेच ना दुरुस्त असलेले मोबाईल तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावेत.अशीही मागणी केली.
हे दोन्ही मुद्दे मध्यवर्ती शासनाच्या पातळीवरील असल्याने या मुद्यांवर विविध पातळीवर चर्चा सुरू असून अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाज करतांना येत असलेल्या अडचणी आणि उपाययोजना याबाबत सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे म्हणून येत्या काही दिवसांत मोबाईल आणि पोषण ट्रॅकर मध्ये मराठी भाषेचा समावेश होण्याची शक्यता आहे आयुक्तांनी सांगितले.
परिणामी संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे पोषण ट्रॅकर एप्लिकेशन मध्ये मराठी भाषेचा समावेश होणार असून नवीन मोबाईल देण्याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वरील अडचणी व समस्या येत्या काही दिवसांत दूर होतील.
यावेळी चर्चेत आयुक्त श्रीमती रूबल अग्रवाल यांच्यासह संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती मायाताई परमेश्वर,सौ. सुशीलाताई कोळी,श्री.सुधीर परमेश्वर यांनी सहभाग घेतला असे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविले आहे.