अमळनेर-लोक न्यूज
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे २३ जुलै
लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते तर लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन सानेगुरुजी वाचनालयाचे संचालक निलेश पाटील यांनी केले तर दिपप्रजोलन चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले.
यावेळी मान्यवरांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचा उजाळा दिला.गुरूपोर्णीमा निमित्ताने सभासदांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वाचनालयाच्या उपाध्यक्षा डॉ माधुरी भांडारकर, विश्वस्त बापू नगावकर,संयुक्त चिटणीस सुमित कुलकर्णी, संचालक भिमराव जाधव,ईश्वर महाजन,प्रसाद जोशी
दिपक वाल्हे,व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.