अमळनेर -लोक न्यूज
अमळनेर शहर नगरपरिषद हद्दीतील ढेकु रोड स्थित गजानन नगर मधील  रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अंदाजित १० लाख रुपये खर्च करून या कामाचे काँक्रिटिकरण केले जाणार आहे.
     यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, नगरसेविका गायत्री दीपक पाटील, नगरसेविका अँड.चेतना यज्ञेश्वर पाटील, अँड.यज्ञेश्वर पाटील, प्रा.अशोक पवार, डॉ.रामराव पाटील, शामकांत भदाणे, एस.इ.सोनवणे, एस.बी. सोनवणे, ए.बी.पंडित, राजेंद्र सोनवणे, एस.एस.वाघ, योगेश्वर पाटील, गुणवंतराव पवार, वाल्मिक मराठे, वाय.ए.बोरसे, दिलीप ठाकरे, विट्ठल पाटील,शामकांत पवार सर,तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.