अमळनेर - लोक न्यूज
अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने,मा.ना छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ओ.बी.सीं चे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी आरक्षण पे चर्चा  ह्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज अमळनेर येथे समता परीषदेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री.अनिल नळे,उत्तर महाराष्ट्र निरीक्षक श्री.नितीन शेलार,जिल्हाध्यक्ष श्री.सतीश महाजन यांनी भेट देऊन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्राथमिक चर्चा केली. यावेळी राजेंद्र महाजन,नगरसेवक धनंजय महाजन,जिल्हा नियोजन समिती चे मा.सदस्य पंकज चौधरी,प्रा. हिरालाल पाटील,मा.उपनगराध्यक्ष अनिल महाजन,प्रा.भिमराव महाजन,तालुकाध्यक्ष अमोल माळी,शहराध्यक्ष प्रताप पाटील उपस्थित होते.
   यावेळी ता.१६ जुलै शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता मेळाव्याची तारीख व वेळ निश्चित  करण्यात आली. सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष अमोल माळी यांनी केले.