लोक न्यूज-

प्राथमिक  आरोग्य केंद्र मारवड अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र धार येथे दिनांक दहा आणि बारा रोजी असांसर्गिक आजार तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिरात तीस वर्षावरील एकूण नव्वद लोकांची मधुमेह, उच्च रक्तदाब, मौखिक कर्करोग,  स्तनाचा कर्करोग  या  आजारांकरीता तपासणी करण्यात आली आणि संशयित रुग्णांना अधिक तपासणी आणि उपचाराकरीता प्राथमिक  आरोग्य  केंद्र  मारवड येथे   संदर्भित करण्यात आले.सदर शिबिर तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.गिरीश गोसावी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र  मारवड येथील वैद्यकिय अधिकारी  डॉ. आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश गोकुळ पाटील यांनी  आरोग्य सेवक श्री. ठाकूर  आणि  आशा स्वयंसेविका  सुनंदा सुभाष गोसावी, वंदना अरविंद बोरसे  यांच्या सहकार्याने रुग्ण तपासणी  केली. या  शिबिराला धार उपसरपंच  श्री. शशिकांत माधवराव पाटील, माजी उपसरपंच  राजेंद्र तुळशीराम पाटील, सदस्या दमोताबाई   सखाराम पाटील, भानुदास आत्माराम पाटील यासह ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांचे सहकार्य आणि सहभाग लाभले.