लोक न्यूज-

अमळनेर :-येथील ग्रामीण रुग्णालयास खासदार श्री उन्मेषदादा पाटील यांच्या माध्यमातून मा.आमदार श्री शिरिषदादा चौधरी यांच्या पाठपुराव्याने डिजिटल एक्सरे मशीन उपलब्ध झाले त्याची पाहणी आज करण्यात आली.मागील काळात अमळनेर तालुका कोरोना मुळे हादरून गेला होता.त्या काळात अमळनेर कारांना झालेला त्रास कधीच विसरू शकत नाही त्या वेळेस देखील माजी आमदार श्री शिरिषदादा चौधरी   स्वखर्चाने सर्वत्र  निर्जंतुकी फवारणी केली होती त्यामुळे अमळनेर कारांना मानसिक आधार मिळून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते.त्याच प्रमाणे ग्रामीण रुग्णालयास मागील काळात 5 व्हेंटिलेटर प्रधानमंत्री केअर फंडात खासदार श्री उन्मेषदादा पाटील यांचा सहकार्याने आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवाराचा पाठपुराव्याने उपलब्ध करून घेतले होते.नवीन डिजिटल एक्सरे मशीन उपलब्ध झाल्याने अमळनेर कारांना त्याचा लाभ घेता येत आहे.आज मा. आमदार श्री शिरिषदादा चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देत एक्सरे मशीन ची पाहणी करत डॉक्टर श्री ताडे यांचा सोबत चर्चा करून आवश्यक साधनाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देत पाहणी केली.याप्रसंगी गटनेते बबली पाठक, बाळासाहेब संदानशिव,मा.जिल्हा नियोजन समिती पंकज चौधरी, धनंजय महाजन, किरणभाऊ बागुल, योगेश पाटील, अनिल महाजन आदी सह मित्र परीवार कार्यकर्ते उपस्थित होते