अमळनेर---तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी व गेल्या 30 वर्ष्यापासून उदरनिर्वाह साठी उधना येथे वास्तवास असलेले विक्रम पोपट पाटील हे नुकत्याच झालेल्या उधना(सुरत) महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत त्यांनी आपली उमेदवारी उधना च्या वार्ड क्रमांक 25 मधून केली होती,त्यांचा सुमारे चार हजार च्या वर मताधिक्याने विजय झाला आहे ,विक्रम पाटील हे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती ,प स सदस्य मांडळ चे माजी सरपंच डॉ अशोक हिम्मत पाटील यांचे पुतणे आहेत,डॉ अशोक पाटील व त्यांचा मित्रपरिवार हे गेल्या 15 दिवसापासून त्यांचा प्रचार करण्यासाठी उधना येथे तळ ठोकून होते,डॉ अशोक पाटील हे मूरब्बी व जेष्ठ व अनुभवी राजकारणी असल्याने त्यांचा विजय खेचून आणला आहे,त्यांचा विजयात डॉ पाटील यांचा मोठा सिहांचा वाटा असल्याचं मत नगरसेवक विक्रम पाटील यांनी व्यक्त केले आहे त्यांच्या विजयाने मांडळ गावातून सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच किरण जैन सागर टेलर,भास्कर पाटील,विलास पाटील,साहेबराव पाटील,अनिल पाटील, योगराज पाटील,पिंटू पाटील,गुलाब पाटील,प्रकाश पाटील,रतीलाल पाटील,विजय पाटील,नथ्थु पाटील आदी नी त्यांचे अभिनंदन केले आहे, त्यांच्या विजयाने गावात फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे