अमळनेर- लोक न्यूज
दिव्यांगांना पिवळी शिधापत्रिका व अंत्योदय योजने प्रमाणे महिन्याला ३५ किलो धान्य मिळावे यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संथापक अध्यक्ष तथा मा.नामदार बच्चूभाऊ कडू राज्य महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली श्री अभय पवार व ऍड कविता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार व प्रा.जयश्री साळुंके यांच्या सलग लावून धरलेल्या दिव्यांग विकास दिव्यांग पुनवर्सन हा विषय दि.२१ नोव्हेंबर २०२० च्या अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या दालनात बैठक घेऊन दिव्यांग अंत्योदय पिवळी शिधापत्रिका बाबत चर्चा करून लवकरात लवकर दिव्यांगांना पिवळी शिधापत्रिका वाटप करण्यात येईल असे लेखी उत्तर देऊन जे दिव्यांग या योजने पासून वंचित आहेत त्यांनी पुरवठा शाखेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.
सदरील योजनेला आज दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ पासून सुरवात करण्यात आली आहे प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार मिलिंदकुमार वाघ, पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे,नायब तहसिलदार योगेश पवार, प्रहार संघटना शहराध्यक्ष योगेश पवार , प्रा.जयश्री साळुंके यांच्या उपस्थितीत अमळनेर तालुक्यातील ४० दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय पिवळी शिधापत्रिका वाटप करण्यात आली. व जे लाभार्थी या योजनेला पात्र असतील अश्या दिव्यांग बांधवांनी अर्ज केल्यानंतर टप्याटप्याने शिधापत्रिका वाटप करण्यात येणार असल्याचे तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सांगितले. प्रहार संघटना शहराध्यक्ष योगेश पवार व प्रा. जयश्री साळुंके यांनी दिव्यांगांना नगरपरिषद ५% निधी, पंचायत समिती निधी, ग्रामपंचायत ५% निधी,संजय गांधी योजना, दिव्यांग घरकुल योजना अश्या योजनेसाठी वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करून तालुक्यात एक आदर्श निमार्ण केला असून तहसिलदार मिलिंदकुमार वाघ,प्रांताधिकारी सीमा अहिरे, तसेच सर्व दिव्यांगांच्या वतीने प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले आहे.