लोक न्यूज-
 अमळनेर येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे नुकताच राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि सुभराऊ फाऊंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांचा प्रतिनिधिक स्वरूपात मेळावा पार पडला. सदर मेळाव्यात कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कोरोना मुक्तीसाठी योगदान देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात भवानी चौक पैलाड,अमळनेर येथील अंगणवाडी क्रमांक-91च्या सेविका सौ. उषा रामकृष्ण पाटील यांना अंगणवाडी संघटनेच्या राज्याध्यक्षा मायाताई परमेश्वर ( नवी मुंबई) यांच्या हस्ते  तसेच सुभराऊ फाऊंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.