अमळनेर(लोक न्यूज) 

"छ. शिवाजी महाराज जागतिक किर्तीचे महापुरुष आहेत त्यांना एखाद्या जाती धर्मात बांधून लहान करू नका!" असे प्रतिपादन विठ्ठल नगर येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित जाहिर व्याख्यानात शिवव्याख्याते प्रा.लिलाधर पाटिल यांनी केले.
             छ. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व विश्वाला दिशा देणारे आहे.
छ.शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा शिवविचार डोक्यात घेतल्यास बहुजनांचे कल्याण होईल. छ.शिवाजी महाराज हे केवळ मराठी भाषिकांचे,मराठ्यांचे किंवा हिंदूंचे राजे  म्हणून ओळखले जात नाही तर ते सर्व रयतेचे राजे होते!असेही प्रा.लिलाधर पाटिल यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रम अध्यक्ष म्हणून मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल  हे यांनी याप्रसंगी बोलताना  'विठ्ठल नगर ओपन स्पेस ला छ. संभाजी महाराजांचे नावं देऊ हि स्थानिकांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविकात युवा कल्याण प्रतिष्ठाण चे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी येत्या काळात महापुरुष जागर व्याख्यानमाला सुरू करीत असल्याचे जाहिर केले. सूत्रसंचालन अशोक पाटिल, बन्सीलाल भागवत यांनी केले.
                यावेळी कोरोना योध्यां चा सत्कार करण्यात आला. वसंत पाटिल,पांडुरंग सावंत, मनोहर नेरकर,एस.एन.पाटिल,सौ.भारती पाटिल,डॉ.संजीव पाटिल,श्रीमती प्रतिभा चव्हाण,अशोक इसे ,सौ छाया इसे,डॉ. विजय पाटील आदींचा प्रशस्ती पत्र देत  गौरव करण्यात आला.तर रघुनाथ शिंदे,सौ.जयश्री देशमुख, महेंद्र बोरसे ,डॉ.भुपेंद्र पाटिल यांचाही सत्कार करण्यात आला.
                 याप्रसंगी मंचावर मा.नगराध्यक्ष विनोद पाटिल, ऍड.यज्ञेश्वर पाटिल हे उपस्थित होते.यावेळी श्रीमती भानुबेन शहा गोशाळेचे चेतन शहा,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, बी.डी. पाटिल,जे एस.पाटिल, हिम्मत पाटिल,गोकुळ बोरसे आबा,व्ही सी पाटिल यांचेसह परिसरातील नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा कल्याण प्रतिष्ठाण चे उपाध्यक्ष यतीन पवार ,जगदंब ग्रुप,पिंपळे रोड राजा मित्र मंडळ, विठ्ठल नगर परिसरातील युवक व जेष्ठ नागरिकांनी प्रयत्न केले.