अमळनेर- लोक न्यूज

शहरात नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी यांनी एका समाजातील दिक्षार्थीचे बॅनर उतरविण्याऐवजी फाडल्याने ते संतप्त भावना निर्माण होणे साहजीचक असून याचा निषेध होत असेल तर गैर नाही, परंतु त्यासोबत ज्याने हे विनापरवाना बॅनर लावले त्याच्यावर आधी कारवाई व्हावी अशी मागणी अमळनेर न प चे नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी केली आहे.
   
          यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नरेंद्र चौधरी यांनी म्हटले आहे की शहर हद्दीत  लावण्यात येणारे डिजिटल बॅनर लावताना नगरपालिकेचा कर भरणे क्रमप्राप्त असून संबधित चालकाचे ते काम आहे,न प च्या उपमुख्याधिकार्यांनी प्रभारी मुख्याधिकारी यांच्या सुचनेनुसार पालिकेची करवसुली मोहीम हाती घेतली असून गेल्या आठ दिवसात अनेक ठाकबाकीदारांच्या मालमत्ता सील करून मोठ्या प्रमाणात वसुली केली आहे,आता त्यांनी अवैध बॅनर कडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे,त्यांना ही मोहीम हाती घेण्यास परवानगी दिली कोणी? याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे,सदर बॅनर चालकांनी गेल्या वर्षभरापासून न प कडे एक रुपयांचा देखील भरणा केला नाही असे संबधित उपमुख्याधिकार्याचे म्हणणे असून त्यामुळेच ही मोहीम हाती घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे,दुर्देवाने त्यांनी सदर अवैध बॅनर उतरविण्याऐवजी थेट फडल्याने भडका उडाला असून त्यामुळे काही समाज बांधव भडकले आहेत,समाजबांधवांची भूमिका काही चुकीची आहे असे मुळीच म्हणायचे नाही परंतु ज्यां कोणी ठेकेदाराने हे बॅनर लावले असेल त्याने किमान असे समाजशील तथा विशेष भावना असणारे बॅनर विना कर भरता लावलेच कसे हा खरा प्रश्न असून याची कसून चौकशी झाली पाहिजे,म्हणजे बॅनर सोबत कराचा पैसा देखील त्यांनी खिशात घातला हे उघड आहे.जर त्याने कराचा पैसा पालिकेकडे भरला असेल तर त्याने तो कुणाकडे भरला आणि त्याची पावती त्याच्याकडे आहे का?की ज्याच्याकडे कराचे पैसे भरले त्यानेही ते पैसे खिशात घातले,या सर्व बाबींची चौकशी झालीच पाहिजे ही आमची मागणी असून संबधित समाजबांधवांनी देखील ही मागणी लावून धरल्यास सारेकही उघड होणार आहे.

          अमळनेर न प मध्ये अश्यपद्धतीने गैर कारभार सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून आता या प्रकरणात समाजबांधवाच्या भावनाशील भावना भडकावून संबधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल हे अटळ आहे.परंतु सद्यस्थितीत न प मध्ये जे गैर प्रकार चालले आहेत त्याकडे जनतेने खऱ्या अर्थाने लक्ष घालण्याची खरी गरज आहे.कदाचीय हा प्रकार उघड झाल्यानंतर न प मध्ये या कराच्या पावत्या आता बनविण्याचे गौडबंगाल झाल्यास नवल वाटू नये अशीच परिस्थिती असून आता समाजबांधवानो खोलात शिरा आणि सन्माननीय अधिकाऱ्यांनो कारवाईची मोहीम राबवण्याआधी यात काय शिजतेय याची जरूर चौकशी करा अन्यथा फसाल एवढीच रास्त विनंती आहे असे पत्रक नरेंद्र चौधरी यांनी काढले आहे.