लोक न्यूज-
ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक सन -2021अंतर्गत मौजे एकलहरे ग्राम पंचायत ता. अमळनेर येथे दिनांक-15/02/2021रोजी सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री राजेन्द्र शिरसाठ यांनी काम पाहिले ग्रामसेवक श्री महेश पाटील यांनी त्यांना सहकार्य केले.यावेळी सरपंच पदी श्री.दिलीप दिनकर पाटील यांच्या पत्नी सौ.विद्याबाई दिलीप (सुरेश) पाटील व उपसरपंच पदी सौ मनिषा बाई बापु माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी पॅनल प्रमुख श्री दिलीप दिनकर पाटील यांनी सौ विद्या सुरेश पाटील सरपंच, मनिषा बाई बापु माळी उपसरपंच, महेंद्र बारूकू पाटील सदस्य , मंगला बाई अभिमन कोळी सदस्या , मंगला बाई नाना भिल सदस्या यांचा सत्कार करण्यात आला सरपंच व उपसरपंच यांचे नाव घोषित करण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्या कडून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य ,सदस्या यांच्या सत्कार करण्यात आला.