लोक न्यूज-
अमळनेर-तालुक्यात गेल्या तीस वर्षांपासून अखंडितपणे भोरटेक धानोरा ग्रामपंचायतीचा गड माजी सरपंच स्व दिलीपसिंग पाटील यांच्या ताब्यात असताना त्यांच्या पश्चात देखील या दोन्ही गावांनी त्यांच्या कुटुंबावर मोठा विश्वास दाखवत हा गड पुन्हा त्यांचे सुपुत्र अमोल राजपूत यांच्या ताब्यात दिला आहे.
सदर निवडणूकित अमोल राजपूत यांच्या पॅनलने संपूर्ण सहा जागांवर एकहाती विजय मिळविल्यानंतर नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच पदी विजूबाई दिलीप ठाकरे तर
उपसरपंचपदी स्व दिलीपसिंग पाटील यांच्या सुनबाई सौ पूर्वा अमोल राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली,निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बांधकाम विभागाचे रविंद्र पाटील यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक नीतीन पाटील यांचे सहकार्य लाभले,सदर निवड प्रसंगी नवंनिर्वाचित सदस्य अशोक गटलु इंडाईस,सूनदाबाई गुलाबराव शिंदे,ठगुबाई हिरामण सोनवणे,सुनील भगवान पवार आदी सहा सदस्य उपस्थित होते.पॅनल प्रमुख म्हणून मनोज सुमेरसिंग राजपूत आणि अमोल दिलीपसिंग राजपूत यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांना सर्व ग्रामस्थांचे
सहकार्य लाभले.
दरम्यान गेल्या 30 वर्षापासून एकाच घरात सत्ता तथा सरपंचपद कायम राखण्याचा विक्रम दिलीपसिंग पाटील यांच्या नावावर असून हा विक्रम असणारे तालुक्यात तालुक्यात ते एकमेव आहेत,नुकतेच त्यांचे निधन झाले असताना ग्रामस्थांनी त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून मुलगा आणि सुनेच्या हातात सत्ता सोपविल्याने ग्रामस्थांच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही अमोल राजपूत यांनी दिली आहे.