लोक न्यूज-
अमळनेर : बेकायदेशीर फलक काढायला गेलेल्या उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना शिवीगाळ मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल शहरातील खान्देश शिक्षण मंडळ , अर्बन बँक पदाधिकारी आणि नगरसेवक अशा 10 जणांसह 20 ते 25 जणांवर सरकारी कामात अडथळा आणून लोकसेवकाला दुखापत पोहचविण्याचा आणि दंगल व जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.16 रोजी रात्री साडे आठ वाजता उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड हे आपल्या कर्मचाऱ्यांसह अनधिकृत फलक काढायला गेले असता योगेश घेवरचंद कोठारी , भरत घेवरचंद कोठारी , नगरसेवक महावीर उर्फ पपु पहाडे , खाशी संचालक जितेंद्र मोहन जैन , चेअरमन योगेश मुंदडा , नगरसेवक निशांत अग्रवाल , संजय तीलकचंद जैन , प्रसन्न जैन , दीपक नीरज देसाई उर्फ कालु अर्बन बँक संचालक पंकज मुंदडा यांच्यासह 20 ते 25 जणांनी आरडाओरड करत शिवीगाळ केली व बॅनर काढण्यास विरोध केला म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणण्याचा , दंगलीचा , तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाययक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत आहेत.