अमळनेर - लोक न्यूज
शिवजन्मोत्सवानिमित्त चित्रकलेच्या माध्यमातून बालकांना शिवरायांचे व्यक्तित्व कळावे हा उद्देश ठेवून
येथील राजमुद्रा फाउंडेशन आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचा शुभारंभ छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अर्बन बँकेचे चेअरमन अभिषेक पाटिल,सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांनी पुष्पहार अर्पण करून केला.तर कृ उ बा संचालक विजय पाटिल, अनिल बोरसे, शालिक पाटिल आदिंनी प्रतिमा पूजन केले.प्रास्तविक राजमुद्रा फाउंडेशन चे अध्यक्ष नगरसेवक श्याम पाटिल यांनी केले.सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी संदेश पाटिल,बाळासाहेब शिसोदे, जयवंत शिसोदे,अशोक पाटील, नानासाहेब पाटील, जयवंतराव पाटील, विजय चव्हाण बापू पाटिल आदिंसह मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मोठ्या संख्येने तीन गटात झालेल्या या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.सोशल डिस्टनसिंग व मास्क चा वापर करीत स्पर्धक व पालक यावेळी उपस्थित होते.
शिवजन्मोत्सव चित्रकला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अक्षय चव्हाण,किरण पाटील, विशाल पाटील, सारंग लोहार,निनाद शिसोदे, उज्ज्वल मोरे,राहुल पाटील, तेजस पवार,दर्पण वाघ,उमेश पाटील, विपुल पाटील, कुणाल पाटील, गौरव पाटील, निलेश पाटील, सागर ठाकरे,मयूर पाटील, तुषार वायकर,अधिकार पाटील, निखिल सूर्यवंशी, आदि राजमुद्रा फाउंडेशन चे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.