-लोक न्यज-

 अमळनेर- नुकतेच अमळनेर दौऱ्यावर येऊन गेलेले राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आमदार अनिल पाटील यांनी देखील शुक्रवारी यवतमाळ येथून परतल्यावर कोरोना चाचणी केली त्यात आरसीपीटीआर व अँटीजेन दोन्ही स्वॅप देऊन चाचण्या केल्या. त्यानंतर घरीच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या नंतर त्यांनी स्वतःला होम क्वांरटाईन करून घेतले. आगंतुक व्यक्तींना सूचना करण्याची माहिती त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिली व शुक्रवारी शिवजयंती असल्याने त्यांनी शहरातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून सदर अहवाल प्राप्त होईस्तोवर ते होम क्वांरटाईन राहणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी स्वतः दिली आहे.
पाडळसरे धरण पाहणी करण्यासाठी व राष्ट्रवादी मेळावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री एकनाथ  खडसे हे अमळनेर दौऱ्यावर असताना आमदार पाटील यांचा अत्यंत जवळचा संपर्क त्यांच्यासोबत आला. त्यानंतर आमदार पाटील यवतमाळ जिल्ह्यात पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांना दोघांच्या कोरोना अहवालाची माहिती मिळाल्याने त्यांनी स्वतः कोणता त्रास नसला तरी एक स्वतःची आणि जनतेची काळजी म्हणून अमळनेर येथे शुक्रवारी कोरोना चाचणीचा निर्णय घेतला असून अहवाल येईस्तोवर ते बंदिस्त राहणार आहेत. तरी जनतेने याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.