अमळनेर - लोक न्यूज 

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कडून यंदा मिरवणूक न काढता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे विविध कलपथकांच्या कार्यक्रमातून छ.शिवाजी महाराजांना कार्यक्रम स्थळीच जल्लोषपूर्ण मानवंदना देण्यात आली.
               छ.शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अमळनेर च्या नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता पाटील, मा.आ.स्मिताताई वाघ, उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे, पोलिस अधिकारी जाधव,तहसीलदार मिलिंद वाघ,पोलिस निरीक्षक अंबादास मोरे,न.पा. चे संजय चौधरी, नगरसेवक श्याम पाटील,भरत पवार, प्रा.जयश्री साळुंखे, सौ.माधुरी पाटिल,मराठा सेवा संघाचे मनोहर पाटिल , सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे मनोज शिंगाने व मित्र परिवाराने याप्रसंगी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून पूजन केले. यावेळी सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केले.यावेळी 'जय जिजाऊ जय शिवराय!'च्या घोषणांनी शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. शिवभक्तांमध्ये शिवजयंती चा जल्लोष यंदाही कायम होता .याप्रसंगी अमळनेर च्या राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन शिवराजांचे पूजन केले.याप्रसंगी विविध न्यूजपोर्टल व वृत्तपत्रांचे पत्रकार यांनी उपस्थिती लावली.
              छ शिवरायांच्या पुतळ्यासमोर  नादब्रह्म ढोल पथकाच्या  युवतींनी शिवगर्जना करीत ढोलताश्यांच्या गजरात कार्यक्रम सादर केला.तर नीलिमा सोनकुसरे व पूनम हटकर यांचे लहान मुलामुलींच्या वृक्षवल्ली लेझिम पथकानेही  शानदार सादरीकरण केले.अमळनेर शहर व तालुक्यातुन युवकांनी मोठा सहभाग घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करीत पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत कला पथकांनी शिवरायांना मानवंदना दिली. शिवजयंती चा जन्म असलेल्या चि. शिवतेज शिंदे चा मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
                सदर कार्यक्रमात शिवभक्तांना मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनी फेटे पुरविले. पिण्याच्या पाण्याची सोय राहुल कंजर, तुषार सोनार, यांनी केली. अल्पोपहाराची व्यवस्था निखिल चव्हाण,राजेश कुंदनांनी यांनी तर छायाचित्रनासाठी उत्स्फूर्तपणे वाजिद शेख,जयेश शिंदे यांनी सहकार्य केले.