धुळे, शिंदखेडा:- रिपोर्ट रविंद्र शिरसाठ
तालुक्यात दिवसेंदिवस बरेच रूग्ण पाॅझीटिव्ह आढळत आहेत यात रंजाणे येथील सदर मुलगी (27) आरोग्य सेविका असुन  शहादा येथे कोविड सेंटर ला कार्यरत आहेत त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्या  गावाकडे आल्या तदनंतर त्यांचा रिपोर्ट रात्री पाॅझीटिव्ह आला असुन व नंदुरबार सिव्हिल येथुन धमाणे येथील वैधकीय अधिकारी डाॅ. बिपिन सोनवणे यांना दूरध्वनी वरून सदर महिला पाॅझीटिव्ह असल्याने कळाले व तात्काळ आरोग्य पथक रंजाणे गावात रात्री च दाखल झाले व त्यांना 108 ने कोविड सेंटर शिंदखेडा  ला रवाना करण्यात आले व ज्या भागात बाधित रूग्ण आढळले त्या भागात ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने निरजंतुकी करण फवारणी करण्यात आली, ज्या भागात संरपंच शोभा ठाकरे, पोलीस पाटील सोनी मोरे, ग्रामसेवक तुषार साळवे, प्राथमिक आरोग्य केंद्र धमाणे चे वैधकीय आधिकारी  बिपिन सोनवणे, आरोग्य सहाय्यक किशोर ओतारी, आरोग्य सेवक डी.जे.वसावे, आरोग्य सेविका सुषमा निकम, शिपाई बापु ठाकरे व आशा वर्कर्स,  यांनी भेट देऊन ग्रामपंचायत तर्फे बाधित क्षेत्रात सिल करण्यात आले संबधित रूग्णाला शिंदखेडा येथील कोविड सेंटर ला उपचारासाठी दाखल करण्यात आले व रूग्णाच्या  संपर्कात आलेल्याना होम कोरनटाइन करण्यात आले.