अमळनेर(रिपोर्ट)

अमळनेर : रासप च्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योती धनराज भोई यांनी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 10 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास शहराच्या पैलाड भागात घडली त्यांच्या आत्महत्यामुळे शहरात चर्चेचा विषय बनला होता 
     ज्योती भोई या बहुचर्चित व्यक्तिमत्व होते गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याने व नुकताच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्या धाडशी स्वभावाच्या होत्या त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने शहरात चर्चेला उधाण आले होते त्यांच्याजवळ सुसाईड नोट सापडल्याची चर्चा शहरभर पसरली होती मात्र या संदर्भात तपासाधिकारी सहा पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर याना सुसाईड नोट खरच होती की नाही याबाबत विचारले असता त्यांनी फक्त तपास चालू आहे असे उत्तर दिले 
    समाधान भोई यांनी अमळनेर पोलिसात खबर दिली की त्यांचे चुलत बंधू भगवान विठ्ठल भोई यांनी सांगितले की ज्योती हिने घरातील जिन्याच्या रेलिंगला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली ग्रामीण रुग्णालयात तिचे शव विच्छेदन करण्यात आले अमळनेर पोलीस  स्टेशनला  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  तपास सहा पोलीस निरीक्षक  प्रकाश सदगीर करीत आहेत